गावाविषयी माहिती
सोनाळे बु. हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे .आलमान गावात पूर्वेला वैतरणा नदी आहे .सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे 1514 आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा १ , अंगणवाडी केंद्रे २ अशी शैक्षणिक व सामाजिक सुविधा उपलब्ध आहेत.तसेच गावामध्ये सन २०२३ पासून पिण्याच्या पाण्याच्या सोईने ग्रामपंचायत आलमान .ने खास ग्रामस्थांसाठी नलयोजना अस्तित्वात असून गावातील १००% कुटुंब त्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात,तसेच गावात पुरातन मंदिरे, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.
गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून कलिंगड तसेच अनेक प्रकारची भाजीपाला लागवड करून ही पिके घेतली जातात. भाजीपाला लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच दुग्ध व्यवसाय करतात
सोनाळे बु. ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सोनाळे बु. गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.
ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ६ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.
सोनाळे बु. गाव आज वाडा तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.